कपूरथला (Kapurthala) जिल्ह्यातील पाडण, गाव येथे गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय खेळाडू अरविंदरजीत सिंह (Arwinderjit Singh) उर्फ पडदा पहलवान याला पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) एएसआय आणि त्याचा पार्टनर मंगूने गोळ्या घालून ठार मारले. त्याचा एक साथीदार गोळी लागल्याने जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात सुभानपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दोन जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलिसात कोणत्या चौकीवर आहे याचा उल्लेख पत्रकात नमूद केलेला नाही. "एएसआय आपला मित्र मंगूला गाडीतून गावी सोडण्यासाठी जात असतांना रात्री दहा वाजता परिसरात कर्फ्यू लागू असताना त्याला त्याच्याकडे दुसरी गाडी येताना दिसली, अरविंदरजीत आणि त्याचा मित्र कारजवळ गेले असता, स्वत:वर हल्ला होण्याच्या भीतीने उपनिरीक्षकाने सरकारी पिस्तूलमधून चार ते पाच गोळ्या झाडल्या," अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्यांनी गाडीचा पाठलाग केला आणि थांबण्याचे संकेत दिले. गाडी थांबली तेव्हा एएसआयने हल्ल्याचा संशय घेत त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरवरून अरविंदरजीत व त्याच्या मित्रावर चार ते पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कबड्डीपटूचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या मित्राला जालंधर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोणाशीही वैयक्तिक वैर नसल्याचे पोलिसांनी ही केवळ गोंधळाची बाब असल्याचेसांगितले. त्यांनी एएसआय आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.
एएसआय व त्याच्या साथीदारा विरोधात आयपीसीच्या कलम 302 आणि 307, 34 अन्वये शस्त्रास्त्र कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शस्त्र आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.