Tokyo Olympics 2020 (Photo Credits: Pixabay)

टोक्यो ओलंपिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धा आज (शुक्रवार, 23 जून 2021) पासून सुरु होत आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर (2020 Tokyo Olympics Opening Ceremony) या स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात होईल. कोरोना व्हायरस महामारीचे सावट विचारात घेता अत्यंत नियोजनबद्ध या स्पर्धा पार पडत आहेत. महामारीचे सावट पाहून या स्पर्धा आगोदरच पुढे ढकलण्यात आ्या होत्या. आता ही स्पर्धा 23 जलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत पार पडत आहे. दरम्यान, क्रीडा विश्वाचे चाहते आणि आणि खेळांवर प्रेम करणारे असंख्य चाहते पाठिमागील अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा प्रत्यक्षात याची देही याची डोळा पाहू शकणार नाहीत. कोरोना काळात ही स्पर्धा होत असल्याने प्रत्यक्षात जरी पाहाता आली तरी या स्पर्धेतील खेळाचे लाईव्ह स्ट्रिमिंग (2020 Tokyo Olympics Opening Ceremony Live Streaming) आपण जरुर पाहू शकता.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातून महिला आणि पुरुष असे मिळून 120 खेळाडू सहभागी झाले आहेत. हे सर्व खेळाडू साधारण एकूण 20 खेळांमध्ये आपली कामगिरी दाखवतील. या खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. या वेळी तरी भारत अधिकाधिक सूवर्ण पदकांची कमाई करेल अशी अपेक्षा आहे. टोकिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धा पूर्व नियोजनानुसार आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी 04.30 वाजलेपासून सुरु होईल. (हेही वाचा, Tokyo Olympics 2020: उद्या होणार खेळांच्या महाकुंभचे उद्घाटन, भारतीय दलातून 30 अ‍ॅथलिट व 6 अधिकारी घेणार सहभाग)

उद्घाटन कार्यक्रमासहीत स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कोठे पाहाल?

सोनी नेटवर्क (Sony Network) हे Tokyo Olympics 2020 स्पर्धेचे भारतातील अधिकृत प्रसारक आहेत. ते या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण करतील. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम Sony Ten 2 SD/HD आणि Sony Six SD/HD आदी चॅनलवर पाहू शकतात. इथे आपल्याला इंग्रजी भाषेत कार्यक्रम आणि सामन्यांचे वर्णनही ऐकता येऊ शकेल.

दरम्यान, Sony Ten 3 SD/HD मार्फत आपण हिंदी माध्यमातून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. ज्यांना तामिळ आणि तेलुगु भाषेत या स्पर्धेचे परेक्षेपण पाहायचे आहे ते Sony Ten 4 SD/HD वर पाहू शकतात. तसेच, DD National वाहिनीवरुनही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.

Tokyo Olympics 2020 Live Streaming पाहा ऑनलाईन

टोक्ये ऑलिम्पीक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे लाईव्ह स्ट्रिमींग आपण ऑनलाईन माध्यमातूनही पाहू शकता. त्यासाठी आपणास SonyLIV, Sony Network चे अधिकृत OTT platformच्या माध्यमातून या समारंभाचे प्रसारण केले जाणार आहे. त्यासाठी आपण विशेष नोंदणी करुन लाभ घेऊ शकता.