Photo Credit- X

National Games 2025: कर्नाटकचा पंधरा वर्षीय नेमबाज जोनाथन अँथनीने (Jonathan Anthony) सोमवारी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या प्रदर्शनादरम्यान, त्याने पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता सरबजोत सिंग (Sarabjot Singh) आणि अनुभवी सौरभ चौधरी (Saurabh Choudhary) यांना मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. जोनाथन अँथनीने 2022 मध्ये सीबीएसई साउथ झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून नेमबाजीत कारकिर्दीला सुरुवात केली. तो सध्या आठवी इयत्तेत शिकत आहे. ( Mitchell Marsh on Jasprit Bumrah: मिचेल मार्शला 4 वर्षांच्या भाच्यामध्ये दिसला जसप्रीत बुमराह; सांगितला 'तो' भितीदायक किस्सा)

जोनाथन अँथनी याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत 240.7 गुणांसह कर्नाटकसाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने अनुभवी रविंदर सिंग (240.3 गुणांसह रौप्य) आणि गुरप्रीत सिंग (220.1 गुणांसह कांस्यपदक) यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. तर, पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरसोबत 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा सरबजोत सोमवारी चौथ्या स्थानावर राहिला.

जोनाथनने यापूर्वी पात्रता फेरीत 578 गुण मिळवून आठव्या स्थानासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर, सौरभ चौधरीनेही 578 गुण मिळवले होते. मात्र, शूट-ऑफमध्ये त्याला जोनाथन अँथनीकडून पराभवाला सामोर जाव लागलं आणि चौथ्या स्थानावर समाधान मानाव लागलं.