Photo Credit- X

Mitchell Marsh on Jasprit Bumrah: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) हा चांगली कामगिरी करू शकला नाही. फलंदाजीत त्याला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मैदानावर जास्तकाळ टीकू दिले नाही. खराब कामगिरीमुळे त्याला श्रीलंकेविरूद्ध कसोटी सामन्यासाठीही संघात स्थान मिळाले नाही. आता तो दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी संघातूनही बाहेर आहे. मार्शने एका कार्यक्रमात जसप्रीत बुमराहविरुद्ध फ्लॉप झाल्यानंतर त्याची भीती अजूनही डोक्यातून जात नसल्याचा खुलासा केला आहे. त्याच्या घराच्या गार्डनमध्ये त्याच्या भाच्यासोबत खेळतानाचा मजेशीर पण भितीदायक किस्सा त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्समध्ये बोलून (Mitchell Marsh Bumrah Nightmare Video)दाखवला. (Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहची फिटनेस टीम इंडियासाठी बनली डोकेदुखी; इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पोहोचला एनसीएमध्ये)

त्याच्या या विधानानंतर उपस्थितांचा एकच हशा पिकला. नुकताच ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड सोहळा पार पडला. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू हजर होते. त्यात बोलताना मिचेल मार्शने बुमराहबाबतचा किस्सा सांगितला. मिचेल मार्शने सांगितले की, ‘माझा चार वर्षांचा भाचा टेडसोबत तो एक दिवस बॅकयार्डमध्ये क्रिकेट खेळत होतो. त्यानंतर अचानक त्याच्या भाच्याने जसप्रीत बुमराहच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला पुन्हा तिच भयानक गोष्ट आठवली', त्याला त्याने नाईट मेअर म्हटले. त्याचे शब्द ऐकून अँकरसह उपस्थित सर्वजण हसू लागले. मिचेल मार्शने ही सर्व घटना विनोदी अंदाजात सांगितली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड सोहळ्यात स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडची सर्वोच्च ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ॲलन बॉर्डर पदकासाठी निवड करण्यात आली तर युवा अष्टपैलू ॲनाबेल सदरलँड हिला सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूसाठी बेलिंडा क्लार्क पदक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये 1427 धावा करणाऱ्या हेडने 208 मतांसह अव्वल पुरस्काराचा मान पटकावला.

4 वर्षांच्या भाच्यामध्ये दिसला जसप्रीत बुमराह

बॉर्डर-गावस्कर कसोटी मिचेल मार्शल तीनदा बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दोन कसोटीत बुमराह त्याला बाद करू शकला नाही, पण बुमराहने पुढच्या दोन कसोटींच्या तीन डावांत त्याची विकेट घेतली. मार्शला दुखापत झाल्यामुळे अखेरची कसोटी त्याला खेळता आली नाही. भारताविरूद्ध कसोटी मालिकेत मार्शने 7 डावांमध्ये केवळ 73 धावा केल्या.