नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) नंतर आता ऑलिम्पिकचं  (Olympic) मैदान गाजवलेला भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग (Boxer Vijender Singh) याने देखील काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश घेतला आहे. मागील काही दिवसांपासून विजेंदरच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या, मात्र सोमवारी काँग्रेस पक्षाकडून दक्षिण दिल्लीतील (South Delhi)  लोकसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवार म्हणून विजेंदरच्या नावाची घोषणा झाल्यावर या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला.

येत्या 12 मे ला पार पडणाऱ्या निवडणुकीत भाजपा (BJP) चे रमेश बिदुरी (Ramesh Bidhuri) आणि आम आदमी पार्टीचे (AAP) राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे विजेंदर सिंग अशी मतांची लढाई पाहायला मिळणार आहे. Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना भाजप कडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर

या बद्दल माहिती देत स्वतः विजेंदर सिंग ने एक ट्विट पोस्ट केलं,"माझ्या २० वर्षाच्या बॉक्सिंग करिअरमध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपल्या भारताला अभिमान मिळवून देण्याचा योग आला होता.आता देशातील रहिवाश्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी काँग्रेसने दिलेली संधी स्वीकारत मी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानतो" असा या ट्विटचा आशय आहे.

विजेंदर सिंगने काँग्रेस पक्षाचे आभार मनात केलेलं ट्विट

यांनतर लगेचच काँग्रेस तर्फे यंदा दक्षिण दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत चाहत्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे, असे सांगणारे ट्विट देखील विजेंदरने केले आहे.

काँग्रेस तर्फे निवडणूक लढवणार असल्याचे सांगणारं विजेंदरचं ट्विट

काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विजेंदर ने हरयाणा पोलिस मधील नोकरीचा राजीनामा दिला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील मतदान १२ मेळा पार पडणार असून त्यानंतर २३ मे ला देशभरात निकाल जाहीर होणार आहे.