#12YearsOfCaptainDhoni: महेंद्र सिंह धोनी याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, ट्विटरवर चाहत्यांकडून माजी कर्णधार पदाचे कौतुक
M. S. Dhoni (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेटसाठी (Indian Criket) महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोलाचे योगदान दिले आहे. धोनीने १४ सप्टेंबर २००७ साली पाकिस्तान (Pakistan) संघाच्या विरुद्ध सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. यामुळे सोशल मिडियावर (Social Media) महेंद्र सिंह धोनीने केलेल्या कामगिरीचे मनापासून कौतूक केले जात आहे. ट्विटरवर #12YearsOfCaptainDhoni असा ट्रेंड सुरु झाला आहे. धोनीच्या चाहत्यानी त्याच्या कर्णधारपदाचे तोंडभरुन कौतूक केले. धोनीने त्याच्या सर्वोकृष्ट खेळीने बिकट परिस्थितही भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत. कर्णधारपदाच्या काळात धोनी जगातील एकमेव कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी जिंकून भारताला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर नेले आहे.

महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलियाचा (Australia) दौऱ्यादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीने २०१७ साली कर्णधार पदाचा भार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे सोपवला होता. सध्या धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार पद भुषवत नसला तरी, सोशल मीडियावर धोनीच्या माजी कर्णधार पदाचे मनापासून कौतूक केले जात आहे. केवळ चाहत्यांकडूनच नाही तर, महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळालेल्या खेळाडूंनीही महेंद्र सिंह धोनीचे कौतूक केले आहे. हे देखील वाचा- India vs South Africa Flashback: जेव्हा कपिल देव यांनी पीटर कर्स्टन यांना केलं होतं मंकड द्वारे आऊट, मैदानात झाला होता राडा, पहा व्हिडिओ

धोनी हा बराच काळ भारतीय कसोटी कर्णधार ठरला आहे. कारण त्याने भारतीय संघाला 60 सामने खेळून 27 सामन्यांत विजय मिळवला आहे. धोनीचा हा विक्रम नुकताच विराट कोहलीने मोडला आहे. कारण त्याने वेस्टइंडीजच्या (West Indies) दौऱ्यावर 28 व्या विजयाची नोंद केली आहे. धोनीने आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफीवर विजय मिळणारा जगातील एकमेव कर्णधार ठरला आहे.

 

सध्या महेंद्र सिंह धोनी संघाबाहेर आहे. त्याच्याजागेवर रिषभ पंत (Rishabh Pant) याला संधी देण्यात आली आहे. परंतु धोनी हा लवकर संघात परतावा अशी, त्याच्या चाहत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच धोनीने अद्याप निवृत्तीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.