India vs New Zealand T20 Series 2019: सततची होत असलेली हार पाहून New Zealand संघात झाले हे बदल, नवीन खेळाडू सामील
न्यूझीलंड संघ (Photo Credit: Getty Images)

India vs New Zealand T20 Series 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांच्या टी -20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांत सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड संघाने आज टी-20 मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा केली आहे. डग ब्रेसवेल आणि ईश सदी यांच्याऐवजी अष्टपैलू जिमी निशाम आणि टॉड अस्टले यांचा संघात समावेश केला गेला आहे. 6 फेब्रुवारीला वेलिंग्टन सिटीमधील वेस्टपॅक स्टेडियमपासून टी-20 मालिकेची सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 8 फेब्रुवारी रोजी ऑकलंडमधील ईडन पार्कमध्ये खेळला जाईल. तर तिसरा सामना 10  फेब्रुवारीला हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जाईल.

एक दिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धतीने खेळून भारतीय संघाने न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केले. दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाने 324 धावांचे लक्ष्य उभे केले होते. मात्र न्यूझीलंडचा संघ 40.2 षटकात फक्त 234 धावाच करू शकला. तिसऱ्या सामन्यात विराट सेनेने 43 षटकात 4 बळी गमावत किवी संघाचे 243 धावांचे लक्ष्य साध्य केले. (हेही वाचा: भारताचा न्युझीलंडवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 3-0 चं वर्चस्व)

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट सेनाने 3-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना 31 जानेवारी रोजी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यात ब्रेक घोषित किला आहे, त्यामुळे पुढील सामन्यात भारतीय संघासाठी रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.