India Vs Australia 3rs Test :  रवी शास्री सामना जिंकल्यानंतर दिसले अतिउत्साही, सार्वजनिक ठिकाणी बिअर प्यायले (Video)
रवि शास्त्री | (Photo courtesy: Twitter)

India Vs Australia 3rd Test : मेर्लबन येथे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला हरवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी साकारत ऑस्ट्रेलिया संघाला 137 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतीय संघ जिंकल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मुख्य प्रशिक्षक रवी शास्री (Ravi Shastri) यांना हा आनंद इतका अनावर झाला की त्यांनी सार्वजनिक ठिकाणीच बिअर प्यायले आहेत.

भारतीय संघ विजयानंतर हॉटेलमध्ये परतले. त्यावेळी भारतीय संघाचे चाहते खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी उभे असल्याचे दिसून आले. तसेच खेळाडू आल्यानंतर शानदारपणे ढोल ताशा वाजवत त्यांचे स्वागत केले. मात्र रवी शास्री बसमधून उतरले तेव्हा त्यांच्या हातात बिअरची बॉटल दिसून आली. बिअर पिण्याच्या नादातच रवी शास्री यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांचा बिअर पितानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तसेच शास्री यांच्या आगमनानंतर विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अन्य खेळाडू बसमधून खाली उतरले. त्यावेळी स्वागतासाठी ढोल ताशे वाजत असल्याने ठेका धरत विजयाचा हा आनंद व्यक्त केला आहे.