श्रेयस अय्यर आणि युझवेन्द्र चहल (Photo: @BCCI/Twitter)

कर्णधार विराट कोहली याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशी आपल्या नावावर केली. तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे थांबलेला सामना नंतर 35 षटकाचा खेळवण्यात आला. कोहलीसोबत युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने उत्तम फलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचविले. अय्यरने 41 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या. अय्यर आणि कोहलीने 120 धावांची भागीदारी केली. कोहलीला सामनावीर आणि मालिकावीर अश्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. (IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीने श्रेयस अय्यर याला दिले विजयाचे श्रेय, स्वतःशी तुलना करत केले हे मोठे विधान)

विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत सर्वात जास्त कोणी प्रभावित केले तो होता अय्यर. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या आणि अंतिम वनडेमाधेर अय्यरने अर्धशतक केले. याचबरोबर त्याने टीमच्या मधल्या फळीतील दावेदारी जवळपास पक्की केली आहे. अंतिम वनडेनंतर श्रेयसने चहल टीव्हीला (Chahal TV) मुलाखत दिली. यात त्याने विंडीजविरुद्ध त्याच्या इंनिंग्सबद्दल सांगितले. श्रेयस म्हणाला की, "जेव्हा ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण चिंताग्रस्त असतात तेव्हा मला अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीत फलंदाजी करायचे आवडते. मला ते आवडते कारण तेव्हा सामना बदलू शकतो आणि काहीही घडू शकते." शिवाय त्याला धडाकेबाज फलंदाजी करण्याआधी सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय खाल्ले असे विचारले असता, तो म्हणाला की, "मी दिनक्रम फॉलो केला. नेहमी प्रमाणे मी तीन अंडी खाल्ली."

दरम्यान, विंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडेनंतर कोहलीने देखील श्रेयसचे कौतुक केले. कोहली म्हणाला, "कठीण परिस्थितीत कामगिरी करण्याचे महत्त्व त्याला समजते. दडपणाखाली श्रेयस धैर्याने खेळला. आपण कसे खेळता आणि कोणत्या प्रकारचे खेळाडू आहात हे आपणास स्वतः समजून घेणे आवश्यक आहे. अय्यर जर अशीच कामगिरी करत राहिला, तर तो मधल्या फळीचा प्रबळ दावेदार असू शकतो."