विराट कोहली आणि लसिथ मलिंगा (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत विरूद्ध श्रीलंका (IND Vs SL 3rd T20I) यांच्यात पुणे (Pune) येथे तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. परंतु, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन मैदानावर (Maharashtra Cricket Association Stadium) पावसाचे सावट दिसत असून हा सामना रद्द होण्याची व्यक्त केली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. मात्र, इंदोर येथे पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जर सामन्यातही पावसाने हजेरी लावली तर, याचा मोठा फटका श्रीलंकेच्या संघाला बसणार आहे. कारण आजच्या सामन्यात श्रीलंका संघ विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरेल. तसेच हा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाला विजयी घोषीत केले जाईल.

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचा पहिला सामना गुवाहाटी येथे होणार होता. परंतु पावसामुळे तो रद्द करण्यात आला. मात्र, इंदूर येथे झालेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा सामना सात विकेट आणि 15 चेंडू शिल्लक असताना आपल्या नावावर केला. आता हे दोन्ही संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात भिडतील. भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, श्रीलंका संघ कोणत्याही परिस्थितीत मालिकेत बरोबरी सोडवण्याच्या प्रयत्न करेल. यातच पुण्यातील महाराष्ट्र असोशिएशन मैदानावर पावसाचे सावट असल्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे श्रीलंकेच्या संघासह भारतीय चाहत्यांमध्येही नाराजी वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- IND Vs SL 3rd T20I: टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज; मालिकेवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज

संघ-

भारत: विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), लोकेश राहुल, नवदीप सैनी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), ओशादा फर्नांडो, अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, लाहिरू कुमारा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंका, भानुण राजकथा , दासुन शंका.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात शुक्रवारी ढगाळ वातावरण असणार आहे. जरी या ठिकाणी पाऊस नाही पडला , तरीदेखील कमाल तापमान 29-30 डिग्री सेल्सिअस राहील तर, सर्वात कमी तापमान 15- 16 डिग्री राहील, असी माहिती हवामान खात्याचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली.