IND vs PAK Manchester Weather and Pitch Report, World Cup 2019: जाणून घ्या कशी असेल मॅन्चेस्टर मधील खेळपट्टी आणि हवामान
(Image Credit: PTI)

 

भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) विश्वकप मधील सामना सुरु होण्यास काही वेळचा शिल्लक आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे नाकारता येत नाही. आता या सामन्यादरम्यान काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: 'हे युद्ध नाही'! भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान)

कसे असेल हवामान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मॅन्चेस्टर (Manchester) मधील वातावरण चांगले राहिल. पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी तो दिवसा पडण्याची शक्यता कमी आहे. शिवाय ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. मात्र, सध्याच्या माहिती प्रमाणे मॅन्चेस्टर मध्ये पावसाने विश्रांती घेतली आणि नाणेफेक वेळेत होण्याची शक्यता आहे.

कोणाला होईल पावसाचा फायदा

मॅन्चेस्टर मध्ये पडणाऱ्या पावसाचा फायदा जलद गोलंदाजांना सामन्यात फायदा होऊ शकतो. संयमाने खेळणाऱ्या फलंदाजांना धावा करण्यात यश मिळेल. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर (Old Trafford) वनडे मध्ये सर्वाधिक धावा 318 इतक्या आहेत. भारत- पाकमध्ये या मैदानात 1999 मध्ये शेवटची लढत झाली होती. शिवाय भारताने या मैदानावर शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध 2007 मध्ये खेळला होता, त्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.

इंग्लंड मध्ये सतत पावसामुळे आतापर्यंत 4 सामने रद्द करण्यात आले आहे आणि यात भारत-न्यूझीलंड यांच्या सामन्याचाही समावेश आहे. विश्वकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये आतापर्यंत 6 सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत.