IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत विरुद्धच्या सामान्य आधी कर्णधार सर्फराज अहमदची खेळाडूंना चेतावनी
Image Source/PTI

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सामना गमवून बसलेल्या पाकिस्तानी (Pakistan) संघाला कर्णधार सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmad) ने बजावून काढले आहे. अहमद म्हणाला, रविवारी होणाऱ्या भारत (India) विरुद्धच्या सामन्यासाठी संघाला आपलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. सर्फराज म्हणाला, "संघाला सुधारण्याची गरज आहे कारण जर आपल्याला ऑस्ट्रेलिया आणि भारतसारख्या मोठ्या संघांना पराभूत करायचे असेल तर खेळाच्या सर्व तीन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत". (IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत विरुद्धच्या सामान्य आधी कर्णधार सर्फराज अहमदची खेळाडूंना चेतावनी)

विश्वचषकाच्या निमित्ताने क्रिकेट विश्वातले हे प्रतिस्पर्धी पुनः एकदा खेळाच्या मैदानात आमने-सामने येतील. विश्वचषकात आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान ७ वेळा एक मेकांशी भिडले मात्र पाकिस्तानी संघ एकदाही भारताला पराभूत करू शकलेला नाही. वर्ल्ड कपमधला हाय वोल्टेज सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाईल.

दरम्यान, इंग्लंडमध्ये सतत होणाऱ्या पावसाचा फटका या सामन्याला होण्याची शक्यता आहे. आणि जर रविवारी पाऊस पडला तर, चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.