India-vs-ENG (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील लॉर्ड्स कसोटी (Test Match) सुरू होण्यास फक्त एक दिवस शिल्लक आहे. गुरुवारपासून सुरू होणारी ही कसोटी जिंकून दोन्ही संघांना (Team) कसोटी मालिकेत आघाडी घ्यायची आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. वास्तविक भारताचा वेगवान गोलंदाज (India's fastest bowler) शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दुसऱ्या कसोटी (second test Match) सामन्यात खेळणे कठीण आहे. शार्दुल ठाकूर हॅमस्ट्रिंगच्या (Hamstrings) समस्येने त्रस्त आहे. अशा स्थितीत तो दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडू शकतो. शार्दुल ठाकूरचे बाहेर पडणे टीम इंडियासाठी (Team India) मोठा धक्का ठरू शकतो. कारण तो फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही तज्ज्ञ आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर त्याने त्याचा ट्रेलरही दाखवला आहे. शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध अनिर्णित पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने दोन्ही डावांमध्ये चार विकेट घेतल्या.

जर शार्दुल या सामन्यात खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीने आधीच सांगितले आहे. भारत 4+1 संयोजनासह जाईल. म्हणजे चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू या संपूर्ण मालिकेत. मागील कसोटी सामन्यात शार्दुल फलंदाजीत फार काही करू शकला नाही आणि जेम्स अँडरसनच्या चेंडूवर खाते न उघडता तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

शार्दुल ठाकूरने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटला पहिल्या डावात बाद करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. शार्दुल ठाकूरने या सामन्यात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत चांगला खेळ केला.  नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून भारताला 1-0 अशी आघाडी घ्यायची आहे.

इंग्लंडचा स्टार बॉलर स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाला आहे. प्रशिक्षणा दरम्यान स्टुअर्ट ब्रॉडची नडगी मुरगळली आहे. बुधवारी त्यांचे स्कॅनिंग केले जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. स्टुअर्ट ब्रॉड कदाचित मालिकेच्या उर्वरित 4 सामन्यांमधून बाहेर असेल. लॉर्ड्सची कसोटी ब्रॉडच्या कारकिर्दीतील 150 वा कसोटी सामना होणार होती. मात्र आता त्याची वाट पाहावी लागेल असे वाटते. ब्रॉड बाद झाल्यास मार्क वुडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.