हॉकी विश्वचषक 2018 (Archived, edited images)
Hockey World Cup 2018 : भुवनेश्वर येथील कलिंगा येथील स्टेडियममध्ये आजपासून हॉकी वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय हॉकी संघ उद्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध हॉकी सामना खेळण्यास सज्ज झाला आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत हॉकीचे सामने चालू राहणार असून एकूण 16 देशांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.
हॉकी वर्ल्डकपची सुरुवात 1971 रोजी चालू झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत पाकिस्तानच्या संघाने सर्वाधिक चार वेळा हॉकीचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच नेदरलँण्ड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3-3 वेळेस हा पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. तर जर्मनीने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. मात्र भारतीय हॉकी संघाने 1975 रोजी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे मायदेशी होणाऱ्या यंदाच्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये जिंकण्याची संधी आहे. या संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंग याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
तसेच भारतीय हॉकी संघाचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नंतर 2 डिसेंबरला बेल्जियम आणि 8 डिसेंबरला कॅनडाविरुद्ध रंगणार आहे. तर भारतीय संघाचे सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता खेळविण्यात येणार आहेत.

हॉकी वर्ल्ड कप संघ गट

‘अ’ गट – अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स.

‘ब’ गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन

‘क’ गट – हिंदुस्थान, बेल्जियम, कॅनडा, द. आफ्रिका

‘ड’ गट – नेदरलॅण्ड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान