टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics ) भाग घेणाऱ्या खेळाडू (Player) आणि अधिकाऱ्यांसाठी सुवर्णपदक विजेत्याला (Gold Medal Winner) रेल्वेने बुधवारी तीन कोटी रुपयांचे विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रेल्वे क्रीडा पदोन्नती मंडळाचे (Sports Promotion Board) 25 खेळाडू, पाच प्रशिक्षक आणि एक फिजिओ प्रतिनिधित्व करीत आहेत. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्या भारतीय तुकडीपैकी जवळपास 20 टक्के लोक रेल्वेचे आहेत. मंत्रालयाने (Ministry) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) मनोबल वाढविण्यासाठी विद्यमान धोरणानुसार टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भाग घेत असलेल्या भारतीय रेल्वे क्रीडापटू आणि अधिकारी यांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत.
यात सुवर्ण पदक विजेत्याला तीन कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला दोन कोटी रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्याला एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. एखाद्या खेळाडूने आपल्या स्पर्धेतील शेवटच्या आठमध्ये अंतिम फेरी पूर्ण केली. तर त्याला 35 लाख रुपये आणि प्रत्येक सहभागीला साडेसात लाख रुपये मिळतील. सुवर्ण पदकविजत्याच्या प्रशिक्षकाला 25 लाख रुपये, रौप्य पदकविजेता प्रशिक्षकाला 20 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेता प्रशिक्षकाला 15 लाख रुपये देण्यात आले. इतर सहभागींच्या प्रशिक्षकांना 7-7.5 लाख रुपये मिळतील.
आज सकाळपासूनच भारतीय खेळाडूंनी ओलंपिकमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरूवात केली आहे. सुरूवातील भारतीय हॉकी संघाने अर्जेंटीना विरूद्धच्या लढतीत जिंकून चांगली सुरूवात केली आहे. त्यानंतर पी व्ही सिंधूनेही सामना जिंकत पदकाच्या दिशेने आपले पाऊल टाकले आहेत. बॉक्सर सतीशने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सतीश कुमारने जमैकाच्या बॉक्सर रिकार्डोविरूद्ध 4-1 ने विजय मिळवला आहे. तर तिरंदाजीत अतानू दासचा विजय झाला आहे. या विजयासह अतानू दासने 16 च्या फेरीत प्रवेश केला आहे. अतानु दासने अत्यंत खडतर सामन्यात कोरियाचा स्टार खेळाडू आणि लंडन ऑलिम्पिकमधील चॅम्पियनचा पराभव केला आहे. ऑलंपिकमधील आज भारतासाठी चांगली सुरूवात झाली आहे.