शोएब अख्तर (Photo Credit: Video Screen Grab)

पाकिस्तान (Pakistan) च्या सिंध प्रांतातील बीबी आसिफा डेंटल कॉलेजमधील विद्यार्थीच्या मृत्यूबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. मृत मुलीचे नाव निमरिता कुमारी (Nimrita Kumari) असून ती डेंटल कॉलेजची बीडीएस शेवटच्या सेमिस्टरची विद्यार्थीनी होती. निमरिताचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत त्यांच्या वसतिगृहात सापडला. त्याच्या गळ्याला दोरी बांधली होती. पण, तिच्या कुटुंबीयांनी तिची परवानगी नसताना तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले आणि तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आला आहे. निमरिताच्या मृत्यूने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हादरला आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे. अख्तरने ट्विटरद्वारे पोस्ट शेअर करत नम्रतासाठी न्याय मागितला आहे. (पाकिस्तान मध्ये 10 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करत बळजबरीने लावले लग्न)

अख्तरने निर्दोष हिंदू मुलीला ट्विटरवर न्याय मिळावा अशी मागणी केली आणि लिहिले, "निरागस मुलगी निमरिता कुमारीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल वाचून खूप वाईट वाटले. मला आशा आहे की तिला न्याय मिळेल आणि दोषी पकडले जातील. माझे हृदय प्रत्येक पाकिस्तानीसाठी धडकतो, त्यांचा धर्म कोणताही असो. तिच्या आत्म्याला शांती लाभो."

पाकिस्तानमध्ये निमरिता कुमारीचा मृत्यू साध्य एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर लोकांनीदेखील 25 वर्षीय विद्यार्थिनीच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी करीत आहेत. पाकिस्तान पोलिसांनी आत्महत्येची शक्यताही फेटाळून लावलेली नाही. आम्ही या प्रकरणाचा सगळ्या बाजूंनी तपास करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. शिवाय, तिच्या घरच्यांनी देखील त्यांची मुलगी आत्महत्या करु शकत नाही, तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप केला आहे. मुलीचा भाऊ डॉ. विशाल सुंदर यांनी हा मोठा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.