भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनविरूद्ध औरंगाबादमध्ये FIR दाखल, ट्रॅव्हल एजंटकडून पैशाच्या फसवणूकीचा आरोप
मोहम्मद अझरुद्दीन (Photo Credit: ANI)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) विरूद्ध महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (Aurangabad) फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शादाब (Mohammad Shadab) या ट्रॅव्हल एजंटवर 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बुधवारी पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. औरंगाबादमधील दानिश टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक मोहम्मद शादाबएन सांगितले की त्यांनी अझरुद्दीन आणि दोन लोकांसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय तिकिटं बुक केली होती, ज्यांच्यासाठी अझरुद्दीनचे पीए मुजीब खान यांनी म्हटले होते, मात्र त्यांना यासाठी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. तथापि, अझरुद्दीन यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणून फेटाळून लावले आहे. त्यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करुन आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले. (अंबाती रायुडू च्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मोहम्मद अजहरुद्दीन ने तोडले मौन, 'हताश क्रिकेटर'च्या टीकेनंतर रायुडू ने फटकारले)

ते म्हणाले, 'माझ्यावर लावलेले आरोप निराधार आहेत. ज्याने हे केले आहे ते फक्त चर्चेत राहण्यासाठी केले आहे. मी लवकरच माझ्या वकीलांशी बोलतो आणि ज्याने तक्रार दाखल केली त्याच्याविरूद्ध मानहानिचा खटला दाखल करीन." मिड-डेच्या वृत्तानुसार, शादाबने तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्याकडून किंमतीच्या 50 टक्के म्हणजेच सुमारे 10.50 लाख रुपये त्याला क्रोएशियाच्या बँकेतून पाठविण्यात आले असल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात आले होते, अंतर असे झाले नाही. जेव्हा शादाबने त्या बँकेत कॉल केला तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की कोणताही व्यवहार झाला नाही. ज्यानंतर त्यांनी एफआयआर नोंदविण्याचा निर्णय घेतला. सिटी चौक पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी ए.डी. नागरे यांनी आयएएनएसला सांगितले की, "आम्ही मुजीब खान (औरंगाबाद), सुधीश अविक्ळल (केरळ), मोहम्मद अझरुद्दीन (हैदराबाद) यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे."

अझरुद्दीन व इतर दोन जणांविरूद्ध कलम 420, 406 आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.