IND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी
Durex India आणि भारतीय टीम (Photo Credits: File Photo)

विश्वचषक 2019 (World Cup 2019) मधील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा सामना उद्या होऊ घातला आहे. फक्त याच दोन देशांतील नाही तर जगभरातील तमाम चाहत्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही देश आपलाच संघ जिंकेल अशा आशयाच्या जाहिराती प्रसिद्ध करत आहे. अभिनंदन वर्तमानच्या बाबतीतील जाहिराती नंतर आता, ड्यूरेक्स कंडोमने (Durex Condom) या भारत-पाक सामन्याबाबत केलेले ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये पाकिस्तानची जिंकण्याची शक्यता फारच कमी असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे, यासाठी कंपनीने आपल्या कंडोमचे उदाहरण दिले आहे.

ट्विटमध्ये ड्यूरेक्स इंडिया ने आपल्या ड्यूरेक्स एयर (Durex Air) कंडोमचा दाखला दिला आहे. यामध्ये कंपनी म्हणते,  ‘परमोच्च आनंदासाठी कोणताही धोका पत्करू नका, वापरा ड्यूरेक्स एयर कंडोम. कारण हे इतके पातळ आहे जितके पाकिस्तानच्या सामना जिंकण्याच्या शक्यता.’ हे ट्विट सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दरम्यान, रविवारी म्हणजेच 16 जून रोजी मँचेस्टर येथे भारत पाकिस्तान सामना पार पडणार आहे. सध्या तरी इथले वातावरण ढगाळ असून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र तरी चाहत्यांचे संपूर्ण लक्ष या सामन्यावर लागलेले आहे. हा सामना फायनल आधीची फायनल समजला जातो. हा सामना ज्या मैदानावर पार पडणार आहे त्याची क्षमता आहे 24,000 मात्र या सामन्यासाठी तब्बल 8 लाख लोकांचे अर्ज आले होते. त्यात आता अशा प्रकारच्या जाहिरातींनी सामन्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे. याआधी पूनम पांडे ने विश्वचषक 2019 बाबत पोस्ट केलेले सेक्सी फोटोज व्हायरल झाले होते.