Photo Credit- X

Divya Deshmukh: भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ टीम चेस चॅम्पियनशिपमध्ये (World Blitz Team Chess Championship) जगातील नंबर एक महिला बुद्धिबळपटू खेळाडू हौ यिफानला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बुद्धिबळ जगात चिनची खेळाडू हौ यिफानला (Hou Yifan) अजिंक्य मानली जाते. म्हणूनच तिच्यावर दिव्याचा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. या दरम्यान, तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सामन्याचे शेवटचे काही क्षण कैद झाले आहेत. ज्यात दिव्या ती जिंकली असल्याचा अंदाज दर्शवते. सामना जिंकल्यानंतर ती तोंडावर हात ठेऊन आनंद व्यक्त करते.

स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पहिल्या सामन्यात दिव्याला यिफानकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसऱ्या सामन्यात तिने जबरदस्त पुनरागमन केले. सफेद रंगांच्या मोहरानी खेळत दिव्याने खेळाच्या सुरुवातीपासूनच यिफानवर दबाव आणला होता. ब्लिट्झ बुद्धिबळात वेळेची अचूक गणना आणि योग्य चाली खूप महत्त्वाच्या असतात आणि दिव्याने ते खूप चांगल्या प्रकारे सिद्ध सांभाळत हा सामना जिंकला.

दिव्या देशमुखने लहानपणापासूनच कौशल्य दाखवले

दिव्या देशमुखचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता दोघेही वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहेत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दिव्याने बुद्धिबळ पटलावर पाऊल ठेवले आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिचे कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, तिने अंडर-7 राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.