अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणारा इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) अंतिम सामना रविवारी संततधार पावसामुळे होऊ शकला नाही. हा सामना चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता. आता अंतिम सामना आज होणार आहे. आजच्या राखीव दिवशी या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले असून आज अहमदाबाद मधील हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार आज संध्याकाळी पावसाची शक्यता नसल्याचे दिसत आहे.
खेळाचा दिवस पुढे ढकळला असला तरी या अंतिम सामन्यावर जास्त फरक पडणार नाही आहे. गुजरातकडून खेळणाऱ्या शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून मोहित शर्मा, राशिद खान, आणि मोहम्मद शामी हे देखील सध्या चांगल्या फॉममध्ये असून या हंगामात त्यांनी चांगले विकेट घेतल्या आहेत. तर दुसरीकडे धोनीचा संघ हा देखील चांगला खेळ दाखवत असून सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा देखील चेन्नईला चांगली सुरुवात करुन देत आहे. तसेच चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली आहे.
Ahmedabad Weather Report ..
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादच्या हवामानाचा अंदाज (फोटो क्रेडिट्स - अॅक्यूवेदर)
रविवारी रद्द झालेल्या खेळाने निराश झालेल्या चाहत्यांसाठी आज आनंदाची बातमी असून आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही आहे. संध्याकाळी 7 च्या सुमारास पावसाची शक्यात नसून तापमान 38 अंशाच्या आपसाप असण्याची शक्यता आहे.