भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) आज अनेक युवा क्रिकेटपटूंचा आदर्श आहे. युवराज दोनदा विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा (Indian Team) भाग राहिला आहे. तथापि, त्याला हवे तितका वेळ क्रिकेट खेळायला मिळाले नाही याची त्याला सर्वाधिक खंत आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबरोबर (Mahendra Singh Dhoni) त्याच्या संबंधांबद्दलही बर्याच प्रकारच्या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. युवराजचे वडील योगराज सिंह धोनीबद्दल अनेकदा बोलले आहेत, पण युवराजने त्याबद्दल बोलणे टाळत आला आहेत, पण आता पहिल्यांदा युवराज धोनीबद्दल काही बोलला आहे. युवीने म्हटले आहे की, माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) जितका त्याला पाठिंबा दिला तितका धोनी आणि विराट कोहलीकडून (Virat Kohli) त्याला मिळाला नाही. युवराज म्हणाला की, "जेव्हा मी संघात (2000 मध्ये) आलो होतो तेव्हा आयपीएल (IPL) नव्हता. मी पडद्यावर माझ्या हिरोंना पहिले आणि मग थेट त्यांच्या शेजारी बसतो. मी त्याचा आदर केला आणि कोठे कसे वर्तन करावे हे त्यांनी मला शिकवले आहे." (COVID-19: युवराज सिंह ने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली शाहिद अफरीदीला साथ, SA Foundation ला मदत केल्याबद्दल नेटिझन्सकडून टीका)
स्पोर्ट्सस्टारशी बोलताना युवीने म्हटले आहे की आजकाल फक्त खेळाडू आयपीएलकडे लक्ष देत आहेत, कारण त्यांना कसोटी क्रिकेट किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळायचे नाही. विशेष म्हणजे युवराजने गांगुलीचे आपला सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून वर्णन केले आहे. सिक्सर किंग युवराज म्हणाला, "मी दीर्घकाळ सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खेळलो आणि त्याने मला खूप पाठिंबा दिला आहे. यानंतर माहीने कर्णधारपद स्वीकारले. अशा परिस्थितीत, कोण चांगले आहे हे निवडणे फार अवघड आहे. माझ्या सर्व आठवणी सौरवशी संबंधित आहेत कारण त्याने मला सर्वाधिक साथ दिली. मला माही आणि विराटकडून (कोहली) इतका पाठिंबा मिळाला नाही."
धोनीच्या नेतृत्वात युवीचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने धोनीच्या नेतृत्वात 104 वनडे सामन्यांमध्ये सरासरी 37 च्या जवळपास 3077 धावा केल्या आहेत, दुसरीकडे गांगुलीच्या नेतृत्वात त्याने 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 2640 धावा केल्या आहेत. 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गांगुलीच्या नेतृत्वात पदार्पण करणारा युवराज राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या काळात खेळला आहे.