विराट कोहली याच्या Running Video ला युट्युबर भुवन बाम ने दिले हटके कॅप्शन; पहा व्हिडिओ आणि कमेंट
Virat Kohli and Bhuvan Bam (Photo Credits: Getty Images/ Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह झाला आहे. रोजच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटनांचे फोटोज आणि व्हिडिओज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अलिकडेच विराट कोहली याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक धावण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हा स्लो मोशन (Slow Motion) व्हिडिओ असून त्याला कॅप्शन सूचवा असे विराट कोहली चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी कॅप्शनचा भडिमार केला. परंतु, युट्युब स्टार भुवन बाम (Bhuvan Bam) याने सुचवलेले कॅप्शन काहीसे हटके ठरले आहे. भुवन बामने आपल्या विनोदी बुद्धीतून केलेली फनी कमेंट लक्षवेधी ठरत आहे.

भुवन बाम ने विराट कोहलीच्या धावण्याच्या व्हिडिओला कॅप्शन सुचवताना म्हटले, "मास्कशिवाय बाहेर पडणाऱ्यांना कोरोना असा पकडेल." या कॅप्शननंतर नेटकऱ्यांनी भुवन बामच्या या क्रिएटीव्हीटीची चांगलीच प्रशंसा केली आणि या गंमतीत तेही सहभागी झाले. (Instagram's Highest-Paid Athlete: लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या विराट कोहली याने कमावले 3 कोटी, क्रिस्टियानो रोनाल्डोचे 18 कोटींसह अव्वल स्थान कायम)

पहा विराट कोहलीचा व्हिडिओ आणि भुवन बामची कमेंट:

 

नुकत्याच रिलिज झालेल्या फोर्ब्सच्या टॉप 100 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीने 66 वा क्रमांक पटकावला आहे. या यादीत विराट कोहली एकमेव भारतीय आणि एकमेव क्रिकेटर आहे. दरम्यान क्रिकेट टीमेचे ट्रेनिंग सेशन पुन्हा सुरु करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. परंतु, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मुंबईत अडकले आहेत.