
Instagram Highest Paid List: कोरोना व्हायरसमुळे जगातील जवळपास सर्व स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. या कठीण प्रसंगी अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पण, भारतीय पुरुष क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या तब्बल 3.6 कोटी रुपये कमावले. लॉकडाऊनमध्ये इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जुव्हेंटस सुपरस्टार आणि पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो याने लॉकडाऊनमधेही इन्स्टाग्रामद्वारे सर्वाधिक मानधन मिळविलेल्या यादीमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. संपूर्ण जग कोरोना विषाणूने त्रस्त असताना रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, शकील ओ'निल आणि डेविड बेकहम सारख्या स्टार अॅथलीट्सनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या इंस्टाग्रामवरून कमाई सुरूच ठेवली. कोरोना व्हायरस उद्रेकानंतर संपूर्ण 2020 स्पोर्टिंग कॅलेंडर ठप्प झाले आहे. अनेक बाधित देशांनी देखील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लावून नागरिकांना क्वारंटाइन करण्याचे पर्याय निवडले. (Forbes 2020 च्या यादीत स्थान पटकावणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू, जाणून घ्या त्याची कमाई)
Attain च्या अहवालानुसार, कोविड लॉकडाऊन 12 मार्च ते 4 मे 2020 दरम्यान रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर आपल्या पोस्टद्वारे तब्बल £1,888,336 (17.9 कोटी रुपये) कमाई केली. इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे 222 कोटी फॉलोअर्स आहेत. एफसी बार्सिलोनाचा दिग्गज आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी प्रायोजित पोस्टच्या माध्यमातून एकूण £1,299,373 (12.3 कोटी) कमाईसह दुसर्या क्रमांकावर आहे. मेस्सीचा माजी बार्सिलोना साधीदार नेमारने लॉकडाऊनमध्ये £1,192,211 (11.4 कोटी रुपये) सह सर्वाधिक तिसर्या क्रमांकाची कमाई केली.
शकील ओ नील प्रथम नॉन फुटबॉल आहे ज्यांनी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 16 प्रायोजित पोस्टद्वारे 583,628 युरो (5.5 कोटी रुपये) कमावले. या संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट सहाव्या क्रमांकावर आहे. लॉकडाऊनमध्ये विराटने 379,294 यूरो (3.6 रुपये) कमावले. कोहली टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू आहे. इंग्लंडचा माजी फुटबॉलर बेकहमची जादू अजूनही कायम आहे. बेकहमने केवळ तीन पोस्टद्वारे 3.8 कोटी रुपये कमावले.