Yasir Shah Death Rumours: पाकिस्तान येथे झालेल्या विमान अपघातानंतर 'यासिर शाह'च्या मृत्युच्या अफवांना ऊत; व्हायरल होत आहेत फेक फोटोज
Yasir Shah (Photo Credits: Getty Images)

आज दुपारी पाकिस्तानमध्ये (Pakistan) लाहोरहून कराचीला (Lahore to Karachi) जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (Pakistan International Airlines) च्या विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये पाकिस्तानचा स्टार लेगस्पिनर यासिर शाह (Yasir Shah) याचे निधन झाले असल्याच्या अनेक अफवा सोशल मिडियावर पसरल्या आहेत. वृत्तानुसार जेव्हा विमान कोसळले तेव्हा विमानात तब्बल 107 लोक उपस्थित होते. त्यानंतर अशा अफवा पसरल्या की, शाह देखील लाहोरहून निघालेल्या याच विमानात प्रवास करत होता. इतकेच नाही तर, शाहच्या मृतदेहाचे फोटो शॉप केलेले फोटोही व्हायरल झाले आहेत. मात्र या वृत्ताबाबत कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही.

अजूनतरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) किंवा स्वत: क्रिकेटरच्या जवळच्या लोकांकडून या बातम्यांविषयी कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही किंवा या बातमीला कुठल्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिला नाही. बर्‍याच लोकांनी असा दावा केला की, या दिग्गज गोलंदाजाच्या मृत्यूची बातमी केवळ एक अफवा आहे. मात्र शाहच्या निधनाच्या अफवेमुळे दु:खी चाहत्यांनी ट्विटरवर शोकसंदेश लिहिणे सुरु केले आहे. शाहचे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 107 लोकांच्या अधिकृत यादीमध्ये नाही. त्यामुळे ही बातमी खोटी, अफवा किंवा निराधार असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये लाहोरहून कराचीला जाणारे विमान A-320 झाले क्रॅश; 90 हून अधिक लोक करत होते प्रवास (Watch Video)

ट्विटर चाहत्यांच्या प्रतिक्रिया -

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, हा अपघात कराची विमानतळाजवळ हे विमान कराचीमध्ये उतरण्यापूर्वी झाला आहे. मालीरमधील मॉडेल कॉलनीजवळील जिना ग्राऊंड भागात हे विमान क्रॅश झाले. विमानतळावर विमान उतरण्याच्या अवघ्या एक मिनिटा आधी विमांशी संपर्क तुटला. पीआयएचे प्रवक्ता अब्दुल सत्तार यांनी अपघाताची पुष्टी केली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये 68 लोकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.