Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी आपल्या क्षेत्ररक्षणात निराशा केली आणि एकूण तीन झेल सोडले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा झटका देत बॅकफूटवर ढकलले, पण यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे कांगारू संघ पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. भारताचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला होता आणि ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली होती. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने केली विक्रमांची मालिका, 21 व्या शतकात मेलबर्नमध्ये असा करणारा ठरला दुसरा गोलंदाज)
यशस्वीने सोडला सोपा झेल
यानंतर दुसऱ्या डावात बुमराह आणि मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले आणि एकवेळ कांगारू संघाची धावसंख्या सहा विकेटवर 99 धावा होती. 40व्या षटकात आकाश दीपच्या चेंडूवर यशस्वीने लॅबुशेनला जीवदान दिले. त्यावेळी लॅबुशेन 46 धावांवर खेळत होता. यशस्वी गल्लीत उभा होता आणि त्याचा सोपा झेल सुटला.
Reaction of Rohit Sharma after Yashasvi Jaiswal dropped a catch.
In his 8 years of captaincy, I have never seen Virat Kohli react like this. This is why Rohit still prays to be 0.1% as good of a leader as Virat. pic.twitter.com/3vLmpOfoB3
— Harshit (@spiral_craver) December 29, 2024
लाबुशेनचा झेल सोडणे भारताला पडला महागात
यशस्वीने झेल सोडल्यामुळे आकाश दीपसह संपूर्ण भारतीय संघ निराश झाला आणि कर्णधार रोहित शर्माला आपला राग आवरता आला नाही. यशस्वीचा झेल सुटण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. लॅबुशेनच्या आधी त्याने उस्मान ख्वाजाचा झेलही सोडला होता. मात्र, 21 धावांच्या स्कोअरवर सिराजने ख्वाजाला बाद केले. लाबुशेनचा सोडलेला झेल भारताला महागात पडला कारण त्याने मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला आणि अर्धशतक झळकावले.
सिराजने लाबुशेनला केले बाद
लाबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 250+ धावांची आघाडी मिळवण्यात यश आले. लाबुशेनला सिराजने एलबीडब्ल्यू आऊट केले. 139 चेंडूत 70 धावा करून तो बाद झाला. लाबुशेनने सातव्या विकेटसाठी कमिन्ससोबत 57 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. सॅम कॉन्स्टास (8) बुमराहचा बळी ठरला. यानंतर सिराजने उस्मान ख्वाजा (21) याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सिराजने स्टीव्ह स्मिथला यष्टिरक्षक पंतकडे झेलबाद केले. त्याला 13 धावा करता आल्या. यानंतर बुमराहचा कहर पाहायला मिळाला. त्याने त्याच षटकात ट्रॅव्हिस हेड (1) आणि मिचेल मार्श (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ॲलेक्स कॅरीला बोल्ड केले. कॅरीला दोन धावा करता आल्या.