WTC Final Trophy (Photo Credit - Twitter)

South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 1st Test Match:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park)  येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025  (ICC World Test Championship 2025) च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या मालिकेत टेंबा बावुमा (Temba Bavuma) दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तान संघाची कमान शान मसूदकडे  (Shan Masood)  आहे.  (हेही वाचा  -  Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची बोचरी टीका)

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाबद्दल बोलायचं झालं तर आहे. पण इथूनचा मार्ग टीम इंडियासाठी सोपा नसेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. उद्या या कसोटीचा शेवटचा दिवस खेळला जाणार आहे.

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 333 धावांची आघाडी घेतली होती. आता या कसोटीचा शेवटचा दिवस सोमवारी खेळला जाणार आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. यानंतर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत खेळवला जाईल. हा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे. टीम इंडियाला हा सामनाही जिंकावा लागेल.