WPL 2023 (Photo Credit - Twitter)

टाटा महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा लिलाव (WPL 2024 Auction) 9 डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या लिलावात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आगामी लिलावात एकूण 165 खेळाडूंची नावे नोंदवण्यात आली आहेत. या यादीत 104 भारतीय महिला खेळाडू आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी 15 खेळाडू सहयोगी देशांतील आहेत. या यादीत एकूण 56 कॅप्ड खेळाडू आहेत, 109 अनकॅप्ड खेळाडू आहेत. पाच संघांना जास्तीत जास्त 30 स्लॉट आहेत. यापैकी 9 स्पॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत. 50 लाख रुपये ही मूळ किंमत आहे, दोन खेळाडू – डिआंड्रा डॉटिन आणि किम गर्थ – यांना टॉप ब्रॅकेटमध्ये ठेवण्याची निवड केली आहे. लिलावाच्या यादीत चार खेळाडूंचा समावेश असून त्यांची मूळ किंमत 40 लाख रुपये आहे.

मुंबईत दुपारी 2.30 वाजता हा लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे. वेळ अधिकृतपणे घोषित करणे बाकी आहे. या लिलावासाठी एकूण 165 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या 65 खेळाडूंपैकी केवळ 30 खेळाडू या लिलावात भाग्यवान ठरणार आहेत. महिला प्रीमियर लीगच्या पाच फ्रँचायझींकडे फक्त 30 स्लॉट उपलब्ध आहेत. (हे देखील वाचा: ICC Player of the Month: आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथसाठी 3 खेळाडूंना दिले नामांकन, 'या' यादीत एका भारतीय खेळाडूचाही समावेश)

या परदेशी खेळाडूंवर पडू शकतो पैशांचा पाऊस 

किम गर्थ : महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाची किम गर्थ ही सर्वात महागडी खेळाडू बनू शकते. किम गर्थची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू किम गर्थने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 च्या सरासरीने 764 धावा केल्या आहेत आणि 20 च्या सरासरीने 45 बळी घेतले आहेत.

डिआंड्रा डॉटिन : वेस्ट इंडिजची स्टार फलंदाज डिआंड्रा डॉटिन या लिलावात सर्वाधिक आधारभूत किंमत असलेली दुसरी खेळाडू आहे. डिआंड्रा डॉटिनची मूळ किंमत देखील 50 लाख रुपये आहे. डिआंड्रा डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 च्या सरासरीने 2697 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत डिआंड्रा डॉटिनने 19 च्या सरासरीने 62 विकेट घेतल्या आहेत.

अॅनाबेल सदरलँड : ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू अॅनाबेल सदरलँड तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. अॅनाबेल सदरलँडने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 144 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. अॅनाबेल सदरलँड निश्चितपणे मोठ्या पैशासाठी जात आहे.

जॉर्जिया वेयरहॅम : ऑस्ट्रेलिया संघाची स्टार गोलंदाज जॉर्जिया वेरहॅमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46 सामन्यात 16 च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या सरासरीने 44 बळी घेतले आहेत. जॉर्जिया वेअरहॅमला लिलावात भरपूर पैसे मिळू शकतात.

एमी जोन्स : इंग्लंडची स्टार यष्टीरक्षक फलंदाज अॅमी जोन्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. एमी जोन्सने 91 टी-20 सामन्यात 121 च्या स्ट्राइक रेटने 1327 धावा केल्या आहेत. एमी जोन्सची मूळ किंमत 40 लाख आहे. आगामी लिलावात एमी जोन्सची किंमत करोडोंमध्ये जाऊ शकते.

शबनिम इस्माईल : दक्षिण आफ्रिकेची दिग्गज वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलवरही पैशांचा वर्षाव होऊ शकतो. शबनीम इस्माईलने 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 च्या सरासरीने 123 विकेट घेतल्या आहेत.