ऑस्ट्रेलियाने 5 वे जेतेपद मिळवत महिला टी-20 वर्ल्ड कप नुकतंच संपुष्टात आला. आणि आता काही दिवसानंतर आयसीसीने (ICC) न्यूझीलंडच्या (New Zealand) राजधानीत महिला वनडे वर्ल्ड कप (Womens' ODI World Cup) 2021 चे वेळापत्रक जाहीर केले. न्यूझीलंडच्या बेसिन रिझर्व्हमध्ये (Basin Reserve) स्पर्धेदरम्यान दोन व्हाइट फर्न्स सामन्यांचे आयोजन करण्याची पुष्टी करण्यात आली. यातील एक 13 फेब्रुवारीला टी-20 चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. ऑकलंड, हॅमिल्टन, टॉरंगा, वेलिंग्टन, क्राइस्टचर्च आणि डुनेडिनमध्ये सामने आयोजित केले जाईल. विश्वचषक स्पर्धेच्या शुभारंभासाठी, बेसिन रिझर्व येथे व्हाईट फर्न्सची कर्णधार सोफी डिवाइन हजर होती. सर्व बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहे. यंदा टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये राखीव दिवस नसल्याने अनेकांनी निराशा व्यक्त केली होती. (ICC Women's World Cup 2021: महिला क्रिकेट विश्वचषकसाठी यजमान शहरांचा खुलासा, जाणून घ्या-कुठे-कुठे होणार सामने)
ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये न्यूझीलंड महिला संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. त्यानंतर दुसऱ्या दिवसही गतजेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ याच मैदानावर आमने-सामने येतील. हॅमिल्टन येथे होणाऱ्या सहा पूल सामन्यांपैकी एक दक्षिण आफ्रिकाविरुद्ध व्हाईट फरन्सचा आणि त्यानंतर सेमीफायनल सामना येथे आयोजित केला जाईल. टॉरान्गामध्ये एक सेमीफायनल आणि पाच पूल सामने आयोजित केले जातील. क्राईस्टचर्चमध्ये 7 मार्च रोजी हेगले ओव्हलयामध्ये फायनलचे आयोजन केले जाईल.
The full fixture list for next year's ICC Women's Cricket World Cup in New Zealand.
Less than 11 months to go until the tournament opener!#CWC21 pic.twitter.com/nc6oWjVjAF
— Cricket World Cup (@cricketworldcup) March 10, 2020
महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शोपीससाठी बक्षीस रक्कम एकूण न्यूझीलंड डॉलर्स 5.5 दशलक्ष आहे. शिवाय, सर्व सामने मोठ्या प्रमाणात जागतिक प्रेक्षकांसाठी प्रसारित केले जातील. दरम्यान यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी यापूर्वीच वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली आहे. आयसीसी महिला चँपियनशिप आणि जुलैमध्ये श्रीलंकेत होणारी पात्रता स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित चार संघ निश्चित होतील. आठ संघांच्या राऊंड रोबिन फेरीतनंतर चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.