सोफी डिवाइन, सुजी बेट्स, अमेलिया केर आणि मिताली राज (Photo Credit: Instagram)

पुढील वर्षी आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2021 साठी जगभरातील न्यूझीलंडमध्ये (New Zealand) क्रीडा चाहत्यांचे स्वागत करणाऱ्या सहा शहरांची पुष्टी झाली आहे. पुढील वर्षी आयसीसीचे 6 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत महिला वनडे विश्वचषकचे न्यूझीलंडच्या सहा शहरांमध्ये आयोजन करणार आहे. या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जाईल आणि अंतिम सामना ख्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर होईल. ऑकलंडच्या ईडन पार्क येथे एक बंपर ओपनिंग वीकएंड आयोजित केला जाईल. त्यानंतर वेलिंग्टन, हॅमिल्टन, टॉरंगा, डुनेडिन आणि क्राइस्टचर्चमध्ये सामने खेळले जातील. हॅमिल्टन आणि टॉरंगामध्ये सेमीफायनल सामने आयोजित केले जातील. ड्युनिडिन आणि वेलिंग्टनसह सर्व ठिकाणी न्यूझीलंड सामने खेळणार आहे. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन (Sophie Devine), सहकारी सुजी बेट्स (Suzie Bates) आणि अमेलिया केर (Amelia Kerr) यांच्यासमवेत या घोषणेदरम्यान उपस्थित असलेल्या भारतीय वनडे संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली की, 'महिलांचे क्रिकेट जगभरात रुची वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.'

गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात हॅगली ओव्हल येथे दिवे बसविण्याला संमती दिल्यानंतर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक फायनलचे यजमानपद क्राइस्टचर्चला देण्यात आले आहे. सध्या यंदाच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी दिवे लागतील हे सुनिश्चित करण्यासाठी सतत देखरेख चालू आहे.

गेल्या विश्वचषकात मितालीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा दमदार खेळ दाखवत या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना यजमान इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले होते. दरम्यान, पुढील वर्षी होणारे वनडे विश्वचषक मितालीचे अंतिम असल्याचे समजले जात असल्याने महिला संघ तिला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न करेल.