KKR vs SRH, IPL 2024 3rd Match: आज हाय व्होल्टेज सामन्यात कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
SRH vs KKR

KKR vs SRH, IPL 2024 3rd Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग सुरू (IPL 2024) झाली आहे. आज दुहेरी हेडर खेळवला जात आहे. सहसा शनिवार आणि रविवारी दोनच सामने आयोजित केले जातात. आज पहिला सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जात आहे. तर, दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्सची कमान श्रेयस अय्यरच्या हाती आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पीट कमिन्स आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आकडेवारीत खूप मजबूत आहेत.

सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर 

एडन मार्कराम: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एडेन मार्करामचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. एडन मार्करामने केकेआर विरुद्ध 50 च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. एडन मार्करामही चांगली गोलंदाजी करू शकतो. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एडन मार्करामवर असतील.

भुवनेश्वर कुमार: भुवनेश्वर कुमारने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत. या कालावधीत भुवनेश्वर कुमारने 32 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारही आपल्या स्विंगने केकेआर संघाला अडचणीत आणू शकतो.

रिंकू सिंग: रिंकू सिंगचा सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धचा रेकॉर्ड खूपच चांगला राहिला आहे. रिंकू सिंगने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 42 च्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात रिंकू सिंग आपल्या बॅटने कहर करू शकतो.

दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज/फिल सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.

सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम/मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार.