टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना पर्थमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पर्थमध्ये चांगलाच घाम गाळत आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांना एकाच समस्येचा सामना करावा लागत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांचे सलामीवीर अपयशी ठरले आहेत. भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुल (KL Raul) विश्वचषकात धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टेंबा बावुमा याच समस्यातुन समोर जात आहे त्यामुळे विश्वचषकात दोन्ही संघ याच अडचणीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत. गटातील गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला संधी?
दरम्यान संघ व्यवस्थापन राहुलऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला संधी देऊ शकते का? ऋषभ पंत हा T20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा भाग आहे, परंतु त्याला अद्याप त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांना हा प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटले आहे की संघ असा काही विचार करत नसल्याचे त्यांनी सांगितले. फक्त दोनच खेळ झाले. राहुल शानदार फलंदाजी करत असून सराव सामन्यातही त्याने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आम्ही सध्या अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. IND vs SA Weather Report: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्येही पाऊस पडणार? जाणून घ्या कसे असेल हवामान)
Can't drop K L Rahul on basis of two bad innings: India batting coach Vikram Rathour #indvssa #t20worldcup2022
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2022
टेंबा बावुमा आउट ऑफ फॉर्म
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टेंबा बावुमाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने दोन सामन्यांत केवळ 4 धावा केल्या आहेत. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र तो बऱ्याच दिवसांपासून आउट ऑफ फॉर्म आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. संघाचा कर्णधार असल्याने त्याला प्लेइंग 11 मधून वगळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत त्याला लवकरात लवकर त्याच्या फलंदाजीबाबत काहीतरी करावे लागेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांचे हे सलामीवीर पुनरागमन करतात की त्यांचा जुना फॉर्म कायम ठेवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.