WI vs ENG 2nd Test: Joe Root याने केन विल्यमसन याला पछाडलं, 25 व्या कसोटी शतकासह इंग्लंड कर्णधाराची कोहली-स्मिथ यांच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल
जो रूट (Photo Credit: Twitter/englandcricket)

WI vs ENG 2nd Test: वेस्ट इंडिज (West Indies) आणि इंग्लंड (England) यांच्यात बार्बाडोस येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. कर्णधार जो रूट (Joe Root) याच्या नाबाद शतकामुळे विंडीजविरुद्ध बार्बाडोस (Barbados) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंड संघ मजबूत स्थिती पोहोचला आहे. माजी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) व विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय स्तरावर शतकी पल्ला गाठण्यासाठी संघर्ष करत आहेत तर ब्रिटिश कर्णधार रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बार्बाडोसमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 25 वे शतक झळकावले. इंग्लिश कर्णधाराने आपल्या खेळीदरम्यान 246 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकार मारले. (WI vs ENG: इंग्लंडवर वेस्ट इंडिजचा ‘अनादर’ केल्याचा आरोप, माजी धुरंधर म्हणाला - ‘भारत, न्यूझीलंड, पाकिस्तानविरुद्ध असे केले असते का?’)

रुटने आपल्या शतकाच्या जोरावर केन विल्यमसन याचा विक्रम उद्ध्वस्त केला असून आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा विक्रम त्याच्या निशाण्यावर आहे. सध्या जो रूटसह केन विल्यमसन, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांची गणना फॅब 4 मध्ये केली जाते. रूटने फॅब-4 मध्ये किवी कर्णधार विल्यमसन याला सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत मागे टाकलं आहेत. विल्यमसनच्या नावावर 86 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतके आहेत, तर रुटने 116 व्या सामन्यात 25 वे शतक झळकावत या यादीत विल्यमसनला पछाडलं आहे. विल्यमसनने 86 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतके केली आहेत, तर रुटने 116 व्या सामन्यात 25 वे शतक झळकावत या यादीत विल्यमसनला मागे टाकले आहे.

फॅब-4 मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्या नावावर आहे. या दोन्ही धाकड खेळाडूंनी कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत प्रत्येकी 27 शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत 2021 चा 'टेस्ट क्रिकेटपटू ऑफ द इयर' रूटच्या निशाण्यावर आता या दोन खेळाडूंच्या विक्रमवीर असेल. दरम्यान विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रुटने शतक झळकावून संघाचा पराभव टाळला होता. दरम्यान, विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 119 धावांची खेळी करणारा रूट कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारी मानसबदार बनण्यापासून फक्त 159 धावा दूर आहे. रूटने आतापर्यंत 9841 धावांची नोंद केली आहे.