WI vs ENG: इंग्लंडवर वेस्ट इंडिजचा ‘अनादर’ केल्याचा आरोप, माजी धुरंधर म्हणाला - ‘भारत, न्यूझीलंड, पाकिस्तानविरुद्ध असे केले असते का?’ जाणून घ्या काय आहे प्रकरण
जो रूट (Photo Credit: PTI)

WI vs ENG 2022 Series: वेस्ट इंडिजचा (West Indies) माजी अष्टपैलू कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटने (Carlos Brathwaite) इंग्लंड कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) याच्यावर अनादर केल्याचा आरोप केला आहे. अँटिग्वा (Antigua) येथील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी शेवटचे पाच चेंडू शिल्लक असताना रूटने सामना ड्रॉ केला नाही. 70 षटकांत विजयासाठी 286 धावांची गरज असताना, वेस्ट इंडिजने दुपारच्या जेवणानंतर अनेक विकेट गमावल्या आणि 147-4 अशी बिकट स्थिती झाली. एनक्रुमाह बोनर 138 चेंडूंचा सामना करून नाबाद 38 आणि जेसन होल्डर 101 चेंडूचा सामना करून नाबाद 37 धावांत परतला. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिली असताना सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत खेचण्याचा इंग्लंडचा निर्णय ब्रॅथवेट याला पातळ नाही आणि त्याला ‘अनादरपूर्ण’ म्हटले.

बोनर आणि होल्डर क्रीजवर तळ ठोकून खेळत होते आणि षटके कमी होत गेली पण तरीही पाहुण्या संघाने सामना अनिर्णित ठेवण्याची इच्छा दाखवली नाही. ब्रॅथवेटने बीटी स्पोर्टला सांगितले की, “जर मी वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ खेळाडू असतो तर माझ्यासाठी हे थोडे अपमानास्पद वाटले असते की शेवटच्या तासात दोन खेळाडू क्रीजवर झुंज असून आणि खेळपट्टीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने इंग्लंडला सहा विकेट मिळू शकतील असे वाटले आणि त्यांनी फक्त पाच चेंडू शिल्लक राहिल्यावर वाट पाहिली.”

ब्रेथवेट पुढे म्हणाला, “अ‍ॅशेस कसोटी असली तरी इंग्लंडने असे केले असते का? त्यांनी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध असेच केले असते का? मला वाटते याचे उत्तर नाही आहे, मग त्यांनी आमच्या विरोधात असे का केले. वेस्ट इंडिजला वचनबद्धतेची गरज असल्यास मला वाटते की ते खेळाच्या त्या भागातून ते मिळवतील. त्यांनी विचार केला पाहिजे की आम्ही चांगले आहोत हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे दोन कसोटी आहेत.” बोनर आणि होल्डर यांनी पहिल्या डावात 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यानंतर 80 धावांची नाबाद भागीदारी केली.