West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना 10 डिसेंबर (मंगळवार) रोजी वॉर्नर पार्क, बॅसेटेरे,(Warner Park, Basseterre) सेंट किट्स (St Kitts) येथे खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ची स्पर्धा झाली. वेस्ट इंडिजने 22 आणि बांगलादेशने 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - PAK vs SA 1st T20I 2024 Key Players: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात 'हे' खेळाडू करू शकतात कहर, आपल्या घातक कामगिरीने बदलू शकतात सामन्याचा मार्ग)
पाहा पोस्ट -
The #MenInMaroon win the toss & will bowl first in the 2nd CG United ODI.💥#WIvBAN #WIHomeForChristmas #TossResult pic.twitter.com/cKGyQNoBqD
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ: ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, मार्किनो मिंडले, गुडाकेश मोती, जयडेन सील्स.
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: तनजीद हसन, सौम्या सरकार, लिटन दास, मेहदी हसन मिराज (कर्णधार), अफिफ हुसेन, महमुदुल्लाह, झेकर अली (विकेटकीपर), रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, शोरीफुल इस्लाम, नाहिद राणा.