Shikhar Dhawan (Photo Credit - X)

Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Retirement) घेतली आहे. शिखर धवन आता आयपीएलमध्येही खेळताना दिसणार नाही. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. निवृत्तीची घोषणा करताना धवन म्हणाला, "माझ्या आयुष्यात एकच ध्येय होतं, ते म्हणजे भारतासाठी खेळणं. हे ध्येय गाठण्यात मी यशस्वी झालो, ज्यासाठी मी अनेकांचा आभारी आहे. 38 वर्षीय शिखर धवन बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. त्याने 2018 मध्ये शेवटची कसोटी, 2022 मध्ये शेवटची एकदिवसीय आणि 2021 मध्ये शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र, तुम्हाला महिती आहे का? धवनला मिस्टर आयसीसी (Shikhar Dhawan called Mr ICC) म्हणून ओळखले जाते.

धवनला मिस्टर आयसीसी का म्हटले जाते ते जाणून घ्या

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2015 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

आशिया कप 2018 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 10,867 धावा

हे देखील वाचा: Why is Shikhar Dhawan called Gabbar: शिखर धवनला 'गब्बर' हे नाव कसे पडलं, जाणून घ्या टोपणनावाची संपूर्ण गोष्ट

2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवनची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 94 चेंडूत 114 धावा

वेस्ट इंडिजविरुद्ध 107 चेंडूत नाबाद 102 धावा

पाकिस्तानविरुद्ध 41 चेंडूत 48 धावा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत 68 धावा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 31 धावा

विव्ह रिचर्ड्सही धवनच्या मागे

शिखर धवनची आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमधील सरासरी (किमान 1000 धावा) जगातील प्रत्येक फलंदाजापेक्षा जास्त आहे. या बाबतीत शिखर धवनने विव रिचर्ड्स, सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि सईद अन्वरसारख्या दिग्गजांपेक्षा पुढे आहे. आयसीसी वनडे स्पर्धेत धवनची सरासरी 65.15 इतकी आहे, जी सर्वोच्च आहे.