इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा उत्साह कायम आहे. या लीगचे सहा सामने खेळले गेले आहेत. याचा अर्थ प्रत्येक संघाने स्वतःचा एक सामना खेळला आहे. 6 सामन्यांमध्येच ऑरेंज कॅपवरून (Orange Cap) खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. 6 सामन्यांनंतर चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 149 धावांसह पहिल्या स्थानावर आहे, तर लखनऊ संघाचा काइल मेयर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी जोस बटलरने (Jos Buttler) ऑरेंज कॅप जिंकली होती. बटलरने 17 सामन्यात 149.05 च्या स्ट्राइक रेटने 863 धावा केल्या. त्याने 4 शतके आणि 4 अर्धशतके केली होती. यावेळीही बटलरने चांगली कामगिरी केल्यास तो ऑरेंज कॅपचा हक्कदार होऊ शकतो. मात्र, यावेळी कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप पुरस्कार म्हणून दिली जाते.
ऑरेंज कॅप यादी (IPL 2023 ऑरेंज कॅप)
ऋतुराज गायकवाड, सामना-2, धावा 149
काइल मेयर्स, सामना-2, धावा 126
टिळक वर्मा, सामना-1, धावा 84
विराट कोहली, सामना 1 - 82 धावा
फाफ डुप्लेसी, सामना-1, धावा 73
Race to Orange Cap: Players with highest number of runs in IPL 2023
Read @ANI Story | https://t.co/OYaGd9QXMS#IPL23 #OrangeCap #IndianPremierLeague pic.twitter.com/tD1mP0TjmA
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2023
वॉर्नरने तीन वेळा जिंकली ऑरेंज कॅप
आयपीएलच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, डेव्हिड वॉर्नरने गेल्या 15 वर्षांत सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅपचा किताब जिंकला आहे. त्याने एकूण 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकली, तर ख्रिस गेलने हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे.