
IND vs PAK Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रत्येक विभागात पाकिस्तानपेक्षा पुढे असल्याचे दिसून येते. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून टीम इंडिया सेमीफायनलच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकेल. दरम्यान, दुबईच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत याबद्दल माहिती जाणून घेवूया...
कशी असेल खेळपट्टी?
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला. या सामन्यात फिरकी गोलंदाजांव्यतिरिक्त वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळाली. मोहम्मद शमीला 5 यश मिळाले, तर फिरकी गोलंदाजांनाही खेळपट्टीवरून बरीच मदत मिळत होती. फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजांना संघर्ष करताना दिसून आले. तथापि, दुसरीकडे, पाकिस्तान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच या मैदानावर खेळणार आहे.
कसे असेल हवामान?
AccuWeather च्या अहवालानुसार, 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील हवामानाचे कमाल तापमान 32 अंश असणार आहे. तथापि, रात्रीचे तापमान 23 अंश राहील. दिवसा बहुतेक सूर्यप्रकाश असेल आणि हवामान खूप उष्ण असेल. वारे ईशान्येकडून ताशी 15 किलोमीटर वेगाने वाहतील. दिवसा पावसाची शक्यता 1 टक्के आहे, तर रात्री पावसाची शक्यता 2 टक्के आहे. हवामान खात्याच्या मते, पावसामुळे सामन्याची मजा बिघडणार नाही.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
पाकिस्तान संघ
बाबर आझम, इमाम उल हक, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.