USA Vs PAK Who is Saurabh Netravalkar: पाकिस्तानने (Pakistan) 6 जून रोजी विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आपल्या मोहिमेला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना यजमान अमेरिकेशी (PAK vs USA) झाला. पहिल्याच सामन्यात बाबर आझमच्या पाकिस्तानला अमेरिकेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा (USA Beat Pak) लागला होता. या सामन्यात सुपर ओव्हरमधून निकाल लागला आणि यूएसएने सुपर ओव्हर जिंकली. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये यूएसएसाठी शानदार गोलंदाजी केली. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Milestone: रोहित शर्माचा नवा मोठा विक्रम, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या 4,000 धावा पूर्ण)
कोण आहेत सौरभ नेत्रावळकर?
भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावलकरचे नाव आता क्रिकेटप्रेमींच्या ओठावर आहे. ज्याने पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करून अमेरिकेला विजय मिळवून दिला. सौरभचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. 2010 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सौरभ टीम इंडियाचा भाग होता. तो बराच काळ टीम इंडियासाठी देशांतर्गत क्रिकेटही खेळला.
Saurabh Netravalkar, who represented India in the U19 World Cup in 2010, has secured a historical win for the USA by defending 19 runs in the Super Over against Pakistan in the T20 World Cup 2024. 🙌 pic.twitter.com/u9zI3oAukp
— CricTracker (@Cricketracker) June 6, 2024
2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभने भारतासाठी घेतल्या होत्या सर्वाधिक विकेट्स
केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि संदीप शर्मा हे खेळाडू सौरभचे माजी सहकारी आहेत. 2015 मध्ये सौरभ अमेरिकेला गेला होता. त्यानंतर त्याने 2019 मध्ये यूएसएसाठी पदार्पण केले. इतकेच नाही तर सौरभ यूएसए संघाचा कर्णधारही राहिला आहे. 2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सौरभने अप्रतिम गोलंदाजी केली. यूएसए कडून गोलंदाजी करताना सौरभने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. यानंतर सौरभने सुपर ओव्हरमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी संघ केवळ 13 धावाच करू शकला.