
21 वर्षीय भारतीय क्रिकेटर आणि विकेटकिपर रिषभ पंत (Rishabh Pant) याने काही तासांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. अनेक तरुणींचा हार्टब्रेक झाला असेल, ही वेगळीच गोष्ट. 'मैं तुम्हें खुश रखना चाहता हूं' असा मेसेज लिहत रिषभने तिच्या सोबतचा फोटो इंस्टावर शेअर केला. पण रिषभची ही गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) नक्की आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊया ईशा नेगीबद्दलच्या काही खास गोष्टी....
# ईशा नेगी ही इंटीरिअर डिझाईनर असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे.
# ईशा ही दिल्लीची रहिवासी आहे. तिचा वाढदिवस 20 फेब्रुवारीला असतो.
# एमिटी युनिव्हर्सिटीची विद्यार्थी असलेल्या ईशाने साहित्याचे शिक्षण घेतले आहे.
# रिषभची ही क्युट गर्लफ्रेंड सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असून तिचे इंस्टाग्रामवर 36000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.
अलिकडेच रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतला असून विश्रांती घेत आहे.