Who Is Neeraj Chopra Wife Himani Mor: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टेनिसपटू हिमानी मोरशी(Himani Mor) लग्न केले आहे. नीरजने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत. नीरजने त्याच्या लग्नाची (Neeraj Chopra Himani Mor wedding)कुठेही माहिती दिली नव्हती. नीरजने त्याच्या पोस्टमध्ये "प्रत्येक आशीर्वादाबद्दल आभारी आहे" असे लिहिले. निरजची पत्नी हिमानीबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. चाहत्यांना तिच्याबद्दल पहिल्यांदाच ऐकायला मिळाले आहे.
हिमानी मोर कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, हिमानी ही हरियाणातील लारसोली इथली आहे. तिने सोनीपतमधील लिटिल एंजल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. जिथे टेनिस स्टार सुमित नागलने देखील शिक्षण घेतले आहे. २५ वर्षीय हिमानीने दिल्लीतील मिरांडा हाऊस येथून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी प्राप्त केली आहे. तिचा भाऊ हिमांशू टेनिसपटू आहे. सध्या, हिमानी न्यू हॅम्पशायरमधील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात क्रीडा व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
२०१७ मध्ये तैपेई येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये हिमानीने दिल्ली विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. शाळेच्या वेबसाइटनुसार, त्याने 2016 मध्ये मलेशिया येथे झालेल्या जागतिक ज्युनियर टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) च्या वेबसाइटनुसार, 2018 मध्ये हिमानीची कारकिर्दीतील सर्वोत्तम राष्ट्रीय क्रमवारी दुहेरीत 27 आणि एकेरीत 42 होती. 2018 पासून ती फक्त एआयटीए स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. हिमानी सध्या मॅसॅच्युसेट्समधील अमहर्स्ट कॉलेजमध्ये सहाय्यक महिला टेनिस प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहे.
नीरज चोप्राची कारकीर्द
वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा नीरज चोप्रा हा भारतातील दुसरा पुरुष खेळाडू आहे. त्याने टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 मध्ये दोन ऑलिंपिक पदके जिंकली आहेत. नीरज आणि त्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांच्यातील सहकार्य, ज्यामुळे दोन ऑलिंपिक पदके, दोन जागतिक अजिंक्यपद पदके आणि एक आशियाई क्रीडा सुवर्णपदक मिळाले आहे.