West Indies Women vs Scotland Women, 8th match Pitch Report: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा आठवा सामना आज वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजची कमान हेली मॅथ्यूजच्या हाती आहे. स्कॉटलंडचा कर्णधार कॅथरीन ब्रायस आहे. (हेही वाचा:Women T20 World Cup 2024: वुमन्स टी20 विश्वचषक मधून 'हा' पहिला संघ बाहेर जाण्याच्या मार्गावर; भारतीय संघावरही टांगती तलवार )
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 6 गडी गमावून 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 17.5 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. दुसरीकडे, स्कॉटलंडला बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 7 गडी गमावून 119 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 103 धावा करता आल्या.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड एकदाही आमनेसामने आलेले नाहीत. दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
खेळपट्टीचा अहवाल
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये हलके स्विंग पाहू शकतात. तर, फलंदाजांनाही सुरुवातीला सावध राहावे लागेल, परंतु एकदा स्थिरावल्यानंतर खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सोपे होऊ शकते. संघांना पहिल्या डावात किमान 150 धावा कराव्या लागतील. दव दुसऱ्या डावात गोलंदाजांवर परिणाम करू शकते. ज्यामुळे फलंदाजी सोपी होऊ शकते. नाणेफेक जिंकणारा संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
हवामान स्थिती
दुबईतील सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ आणि गरम असण्याची अपेक्षा आहे. तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते. पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडीज संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, स्टॅफनी टेलर, डिआंड्रा डॉटिन, शॅमीन कॅम्पबेल (विकेटकीपर), चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक, शमिलिया कोनेल.
स्कॉटलंड संघ: सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियनाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रॅचेल स्लेटर, अबताहा मकसूद, ऑलिव्हिया बेल.