Women T20 World Cup 2024: आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये (Women T20 World Cup 2024)सहा सामने झाले आहेत. प्रत्येक गट 4 सामने खेळणार आहे. त्यामुळे एका संघाने चार आणि एका संघाने तीन सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. या शर्यतीत आता भारत आणि श्रीलंका या दोन संघाची वाट बिकट झाली आहे. श्रीलंकेचं (Sri Lanka Team) स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. साखळी फेरीतील चार पैकी दोन सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत दोन सामन्यांवर उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे. (हेही वाचा: India Women vs Pakistan Women Head to Head Record: भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात आज हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी)
त्यामुळे वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा रंजक वळणावर आली आहे असं म्हणण्यात हरकत नाही. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटातून टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला हरवले. पाकिस्तानने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केला.
श्रीलंकेला 6 विकेट आणि 34 चेंडू राखून पराभवाला सामोरं जाव लागलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा नेट रनरेट खूपच खाली गेला आहे. उर्वरित दोन सामन्यात त्याची भरपाई करणं खूपच कठीण आहे. अशा स्थितीत श्रीलंका हा संघ स्पर्धेतून बाहेर गेलेला पहिला संघ ठरला, असं म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेचे उर्वरित दोन सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत.
श्रीलंकेने उर्वरित दोन सामन्यात विजय जरी मिळवला तरी इतर संघांच्या कामगिरीवर सर्वकाही अवलंबून आहे. पण नेट रनरेटचं गणित खूपच किचकट दिसत आहे. त्यामुळे त्यातून भरपाई होणं कठीण आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात श्रीलंकेला मोठ्या विजयाची गरज आहे. पण तसं काही होईल असं वाटत नाही. सध्या न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.900 नेटच रनरेटसह पहिल्या स्थानवर आहे, ऑस्ट्रेलिया 2 गुण आणि +1.908 नेट रनरेटसह दुसऱ्या, पाकिस्तान 2 गुण आणि +1.550 नेट रनरेटसह तिसऱ्या, श्रीलंका 2 सामन्यात पराभूत होत 0 गुणांसह -1.667 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, तर भारत 0 गुणांसह -2.900 सर्वात शेवटी आहे.