South Africa Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 3rd Match Live Toss Update: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक सुरु झाला आहे. टी-20 विश्वचषकाचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दुबईतील दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) हातात आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यू (Hayley Matthews) करत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी स्टॅफनी टेलरने सर्वाधिक 44 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान स्टॅफनी टेलरने 41 धावा करताना दोन चौकार आणि एक षटकार लगावला. स्टॅफनी टेलरशिवाय शमीन कॅम्पबेलने 17 धावा केल्या.
Stafanie Taylor's 41-ball 44* helps West Indies set South Africa a target of 119 in the #T20WorldCup match in Dubai
Live Updates: https://t.co/eOGm4fE7Sv pic.twitter.com/Tgd864sE0w
— Sportstar (@sportstarweb) October 4, 2024
स्टार अष्टपैलू मॅरिझान कॅपने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॉनकुलुलेको म्लाबाशिवाय मारिझान कॅपने दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 119 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून दोन्ही संघांना या स्पर्धेत चांगली सुरुवात करायची आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, ॲनेके बॉश, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
वेस्ट इंडिज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, स्टॅफनी टेलर, डिआंड्रा डॉटिन, शमाइन कॅम्पबेल (यष्टीरक्षक), चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, अफी फ्लेचर, करिश्मा रामहरक, शमिलिया कोनेल.