शुक्रवारी झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाने टी -20 तिरंगी मालिकेच्या पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानला (Afghanistan) सात गडी राखून पराभूत केले. परंतु या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या पराभवापेक्षा युवा कर्णधार रशीद खान (Rahid Khan) याने मारलेला षटकाची अधिक चर्चा होत आहे. यावेळी मैदानात असलेले प्रेक्षकही हा शॉट पाहून दंग झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून झिम्बाब्वेसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचे पाठलाग करत झिम्बाब्वेचा संघाने सात गडी राखून हा सामना जिंकला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानचा युवा कर्णधार राशीद खानने केवळ ९ धावा केल्या आहेत. परंतु या दरम्यान, रशीद खान याने एक विचित्र प्रकारे षटकार लगावला आहे. राशिद खानचा हा शॉट पाहून मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक दंग झाले आहेत. हा शॉट मारताना रशीद खानने डोके खाली केले होते, ज्यामुळे त्याच्याकडून चेंडूवर दुर्लक्ष झाले होते. रशीद खानचा शॉट पाहिल्यानंतर काही लोक त्याला टेनिस शॉट म्हणूनही संबोधित आहेत. हे देखील वाचा-IND vs SA 3rd T20I: क्विंटन डी कॉक च्या तुफानी खेळीने टीम इंडिया बॅकफूटवर; 9 विकेट्सने दक्षिण आफ्रिका विजयी, मालिका 1-1 ने ड्रॉ
ट्वीट-
🎾🎾🙈🙈😍🇦🇫🇦🇫✌🏻✌🏻✌🏻 pic.twitter.com/x6AhLQwTWi
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 21, 2019
या सामन्यात अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने 47 चेंडूंचा सामना करताना 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यात ४ चौकार आणि ४ षटकारांच्या समावेश आहे. झिम्बाब्वे संघाचा कर्णधार हॅमिल्टन मसकद्जा याने ४ चौकार आणि ५ षटकारच्या मदतीने ४२ चेंडूमध्ये ७१ धावा केल्या होत्या. ज्यामुळे झिम्बाब्वेच्या संघाला या सामन्यात विजय मिळवता आला आहे.