कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादारून सोडले आहे. क्रिकेट जगतावरही कोरोना विषाणूचा मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील माजी खेळाडू, सामना अधिकारी, स्कोरर आणि ग्राऊंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी पीसीबी कल्याण निधीसाठी (PCB Welfare Fund) 15 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. चेअरमेन वेलफेयर फंडाला पाठिंबा देण्यासाठी आणि या एकात्मता दर्शविण्याकरिता हे छोटे योगदान आहे. कारण आम्ही या कठीण आर्थिक काळात अडचणीत येणाऱ्या खेळाडू, सामनाधिकारी, स्कोअर आणि ग्राउंड स्टाफला जास्तीत जास्त पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे वसीम खान म्हणाले आहेत.
कार्यकारी संघाचा प्रमुख म्हणून मलाही असे वाटते की, मी या बरोबर वैयक्तिक आघाडी घेणे गरजेचे आहे. तसेच हा निर्णय मला अगदी योग्य वाटत आहे, असे वसीम खान म्हणाले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी वसीम यांचे कौतूक केले आहे. दरम्यान एहसान म्हणाले की, वसीम खान केवळ एक चांगला नेता नसून भूतकाळातील आणि सध्याच्या खेळाडूंसह आणि इतर लोकांची काळजी घेत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. मला खात्री आहे वसीमच्या पुढाकाराने क्रिकेटपटूंना मदत होईल. " असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- सचिन तेंडुलकर याने वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत शेअर केला Jofra Archer चा वर्ल्डकप 2019 मधील अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरचा व्हिडिओ (Watch Video)