ICC Latest ODI Rankings: विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध बाबर आजम (Babar Azam) यांच्यातील कधीही न संपणाऱ्या तुलनेवर भारताचे माजी क्रिकेटपटू वसिम जाफर (Wasim Jaffer) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयसीसीने (ICC) काही तासांपूर्वी जाहीर केलेल्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा तडाखेबाज फलंदाज बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीची वर्षापासून सुरु असलेली बादशाहत संपुष्टात आणली आणि रँकिंगमध्ये अव्व्ल स्थान पटकावले. बाबर आता नंबर 1 वनडे फलंदाज असून विराटची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ट्विटरवर हास्यास्पद मिम्ससाठी ओळखल्या जाणार्या जाफरने आणखी एक जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. वनडे क्रमवारीत बाबरने कोहलीला मागे टाकण्याच्या आयसीसीच्या (ICC) ट्विटवर माजी सलामी फलंदाजाने प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा बाबर चौथा पाकिस्तानी फलंदाज आहे. (ICC Ranking: विराट कोहली याला Overtake करत बाबर आजम ठरला अव्वल)
जाफर यांनी लिहिले, “अभिनंदन बाबर आझम, तू पात्र आहेस. पण शीर्षस्थानी फारसा आरामात बसू नकोस, विराट कोहलीला चेस करणं किती आवडतं हे आपल्याला माहिती आहे,” असं ट्वीट वसीम जाफरने केलं. 'कोहलीला चेस करायला आवडते' ही टिप्पणी विशेषतः विनोदी आहे कारण भारतीय कर्णधार आपल्या ऐतिहासिक वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना खेळलेल्या खेळीसाठी ओळखला जातो. पाकिस्तान संघ सध्या तीन सामन्यांच्या वनडे आणि चार सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानी कर्णधाराने यापूर्वी तीन वनडे सामन्यात अनुक्रमे 103, 31 आणि 94 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली.
Congratulations @babarazam258, well deserved. But don't get too comfy at the top, you know how much Virat Kohli loves chasing 😉 #ICCRankings https://t.co/Zl2i8DFHG8
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 14, 2021
दुसरीकडे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराचे शतक हे 76 डावांमध्ये 13 वे शतक होते. यासह बाबर हा कारनामा करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आणि त्याने हाशिम आमला, विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक यांनाही मागे सोडले. विशेष म्हणजे 76 वनडे डावांमध्ये 3683 एकदिवसीय धावा करणारा बाबर आता कोणत्याही फलंदाजाने केलेल्या दुसर्या सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. आझमपूर्वी 76 एकदिवसीय डावात फक्त हाशिम आमलाने 3734 अधिक धावा केल्या होत्या.