VVS Laxman's coach Passes Away: व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि आंध्रचा यष्टिरक्षक एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांचे प्रशिक्षक असलेले अशोक सिंह (Ashok Singh) यांचे सोमवारी आजारामुळे निधन झाले, असे कुटुंबातील सदस्याने सांगितले. ते 64 वर्षाचे होते. सिंह यांनी लक्ष्मणला 1998 पासून मधल्या फळीतील फलंदाजांच्या निवृत्तीपर्यंत प्रशिक्षित केले, असे अशोक सिंह यांचा मुलगा आनंद यांनी सांगितले. "गेल्या वर्षी त्यांच्यावर मेंदूच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते 14 महिने जिवंत राहिले," आनंद सिंह यांनी पीटीआयला सांगितले. त्यांनी 30 वर्ष वेगवेगळ्या स्तरावरील विविध खेळाडूंचे प्रशिक्षण दिले होते, असेही ते म्हणाले. 64 वर्षीय अशोक यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते त्यावेळीच्या रणजी करंडक संघातही होता पण त्यांना पदार्पण करता आले नाही. दरम्यान, भारतचे माजी फलंदाज लक्ष्मण यांनी सिंहच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की अशोक सिंह हे फक्त त्यांचे प्रशिक्षकच नव्हते तर त्यांच्या मोठ्या भावासारखे होते.
लक्ष्मण ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि म्हणाले की, "माझे मोठे नुकसान झाले. अशोक भाई माझे प्रशिक्षकच नव्हते तर मोठ्या भावासारखे होते. ते एक उत्कट आणि समर्पित प्रशिक्षक होते ज्यांनी मला नेहमीच उत्कृष्ट होण्यासाठी प्रेरित केले. तुझी आठवण येईल अशोक भाई."
Big loss to me. Ashok bhai was not only my coach but was like a older brother. He was a passionate and dedicated coach who always motivated me to get better. Will miss you badly Ashok bhai. RIP🙏 https://t.co/KhZB9xt4zl
— VVS Laxman (@VVSLaxman281) November 9, 2020
2001 कोलकाता कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचे लक्ष्मण हे शिल्पकार होते. लक्ष्मण यांनी राहुल द्रविड यांच्यासोबत विक्रमी भागीदारी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. याच सामन्यात लक्ष्मण यांनी कसोटी करिअरमधील सर्वाधिक 281 धावा केल्या होत्या. राहुल आणि लक्ष्मण यांच्यात 376 धावांची विक्रमी भागीदारी झाली. लक्ष्मणने नोव्हेंबर 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद कसोटीत भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षानंतर एप्रिल 1998 मध्ये कटक येथे झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला. लक्ष्मणने भारतासाठी 134 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामने खेळले असून 8,781 कसोटी धावा आणि 2388 वनडे धावा केल्या आहेत.