IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये पावसानंतर विरेंद्र सेहवाग ची दमदार बॅटिंग, डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेत केले हे भन्नाट Tweet
(Image Credit: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वचषकमधील भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघानी 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसाने दमदार बॅटिंग केली. अखेरीस पहिली सेमीफायनल मॅच राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्यावर काही चाहते निराश झाले तर काही चाहत्यांनी आपल्या शैलीत याच्यावर मिम्स बनवत स्वतःला आणि अनीता लोकांचे मनोरंजन केले. आणि यांच्यात भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) देखील मागे राहिला नाही. सेहवागने आपल्या ट्विटरवर धुमाकूळ घालणारे भन्नाट ट्विट केले. (मायकेल वॉन याने संजय मांजरेकर याला ट्रोल करत केले ट्विटरवर ब्लॉक, रवींद्र जडेजा वरून सुरु झाला वाद)

सेहवागने डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेत लिहिले,''पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना डकवर्थ लुईसकडून पगार दिला गेला तर, किती फायद्याचे ठरेल ना. HRचं यावर काय मत आहे?'' सेहवागच्या या ट्विटवर चाहत्यांनी देखील हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, बुधवारी रद्द झालेला भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना ज्या ओव्हरमध्ये, ज्या चेंडूवर थांवण्यात आला होता, तेथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 46.1 व्या षटकात थांबवण्यात आला होता.