भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मोठे शॉट्स खेळण्यासह त्याच्या मजेदार शैलीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सेहवाग मैदानावर क्रिकेट खेळत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सतत आपल्या चाहत्यांशी जुडलेला आहे. मस्त मार्गाने आयुष्य जगणाऱ्या सेहवागने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो षटकार मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ 2015 च्या दरम्यानचा आहे. सेहवागने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सेहवागच्या घातक फलंदाजी पाहायला मिळत आहे. ‘बॉल बघा’, चेंडू मारा’’ या त्याच्या साध्या हेतूने त्याने क्रिकेट विश्वातील जवळपास सर्व गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मंगळवारी सेहवागने जागतिक स्तरावरील गोलंदाजांचा सामना करत असतानाही त्याला मुक्तपणे फलंदाजी करण्यास मदत करणारा मंत्र शेअर केला. टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज बॅटिंग करताना तो कसा गायचा याचा खुलासा त्याने सोशल मीडियावर केला आहे. सेहवागने एक जुना व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो गाताना ऐकू येऊ शकतो आणि माजी दिग्गज गोलंदाज एलन डोनाल्ड (Allan Donald) त्याला गोलंदाजी करताना दिसताहेत. (Video: झए रिचर्डसन याचा अचूक थ्रो, बिग बॅश लीग सामन्यातील 'हा' रन-आऊट पाहून प्रेक्षक झाले आश्चर्यचकित)
सेहवागने त्याच्या ट्विटर अकाउंटवर 4 वर्ष जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ क्रिकेट ऑल स्टार्स लीगचा आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की सेहवाग क्रीजवर बॉल खेळण्यासाठी तयार आहे आणि कैसे बताएं कि तुझको चाहें, यारा बता ना पाएं… हे गाणं गात आहे. मैदानावर परिस्थिती काहीही असली तरी सेहवाग फक्त गाणे म्हणत फलंदाजी करत असायचा. सेहवागने 'जिंदगी किंवा फलंदाजी, फक्त तुझं गाणं गाणे चालू ठेवा' असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. क्रिकेट ऑल स्टार्स टी -20 लीग 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती. जगातील सर्व निवृत्त क्रिकेटपटूंनी या लीगमध्ये भाग घेतला. पाहा सेहवागचा हा व्हिडिओ:
Whether Batting or in life, just keep singing your tune. Kaise batayein.... #TuesdayThoughts pic.twitter.com/lJbgVCMdzo
— Virender Sehwag (@virendersehwag) December 31, 2019
दरम्यान, सेहवागने यापूर्वीही बर्याचदा सांगितले होते की तो क्रीजवर फलंदाजी करताना गाणं गायचा. किशोर कुमार ते मोहम्मद रफीपर्यंतची गाणी सेहवागला आवडतात. सध्या भाष्यकार म्हून सेहवाग आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहे. सेहवागने टीम इंडियाकडून 104 टेस्ट सामन्यात 49.36 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत आणि 251 वनडे सामन्यात 104.34 च्या सरासरीने 8273 धावा केल्या.