इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिने केला न्यूड फोटोशूट, महिलांना महत्वपूर्ण संदेश देत शेअर केला Photo
सारा टेलर (Photo Credit: sjtaylor30/Twitter)

इंग्लंडची (England) महिला क्रिकेटपटू सारा टेलर (Sarah Taylor) ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बाली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये जसे महेंद्र सिंह धोनी जितक्या वेगाने विकेटकीपिंग करतो त्याचप्रमाणे साराही स्पम्पिंग करते. नुकतेच, साराने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत अंगावर एकही कपडा दिसत नसल्याने सारा चर्चेचा विषय बनली आहे. साराच्या न्यूड फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. साराने महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी हा फोटो काढला असून त्यासोबत महत्वाचा संदेशदेखील दिला आहे. आणि यासाठी तिचे कौतुक होत आहे.

साराने सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करते. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर म्हटले आहे की, "न्यूड फोटो काढताना मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तरीही मी या अभियानात सहभागी असल्याचा अभिमान वाटत आहे." सारा पुढे म्हणते की, "प्रत्येक मुलीला तिच्या शरिराचा अभिमान असायला हवा. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही. तरीही मला अभिमान वाटत आहे की womenshealthuk च्या अभियानात मी सहभागी आहे. नेहमीच माझ्या शरिराच्या काही समस्या जाणवल्या आहेत. त्या सोडवण्याच्या निमित्ताने या अभियानाचा भाग होता आलं. प्रत्येक मुलगी सुंदर दिसते आणि लक्षात ठेवा प्रत्येक महिला सुंदर असते."

30 वर्षीय सारा ही भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची मोठी प्रशंसक आहे. आणि तिने अनेकदा विराटच्या खेळीबाबत ट्विटसाठी चर्चेत आली होती. सध्या, मानसिक तणावातून दूर होण्यासाठी साराने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्यण घेतला आहे. तिने यंदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध महिला अ‍ॅशेसमधून देखील माघार घेतली होती.